emblem
महाराष्ट्र शासन

आदिवासी विकास विभाग

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, औरंगाबाद

आदिवासी विकास विभागाच्या विविध योजनांची माहिती

 

उद्देश व स्वरूप पात्रता संपर्क
महाराष्ट्र राज्यात डोंगराळ व दुर्गम भागात राहणार्‍या अनुसूचीत जमातीचे सामाजिक व शैक्षणिक प्रगति होण्यासाठी सन १९७२-७३ पासून क्षेत्रविकासाचा दुष्टीकोन स्विकारण्यात आला. अशा भागाचा मूलभूत विकास व्हावा आणि त्याचा फायदा सर्वांना व्हावा यासाठी मूळ केंद्रस्थान म्हणून आश्रमशाळा असावी. या शाळेत आदिवासी विद्यार्थ्यांची इ. १० वी पर्यंतच्या शिक्षणाची सोय उपलब्ध आहे.
सदर आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना निवास,भोजन,गणवेश,अंथरूण,पांघरूण,पुस्तके व इतर लेखन साहित्य इ. सुविधा शासनाकडून मोफत पुरविण्यात येतात.
 1. आश्रमीय विद्यार्थी हे आदिवासी असावे.
 2. मुला-मुलीस ३१ जुलैला ५ वर्ष पूर्ण असावी.
 3. प्रत्यक्ष प्रवेश देतेवेळी जाती/जमाती दाखला, जन्मतारखेचा दाखला, आई-वडीलांचे प्रतिज्ञापत्र.
 4. पहिली व्यतिरिक्त इतर वर्गातील प्रवेशकरिता पूर्वीच्या शाळेचा शाळा सोडल्याचा दाखला.
 5. आश्रमशाळेच्या १ कि.मी परिसरातील मुले-मुली अनिवासी म्हणून व त्या क्षेत्राच्या बाहेरील निवासी विद्यार्थी म्हणून प्रवेश.
 6. आश्रमशाळेमध्ये प्रत्येक वर्गात निवासी ४० व बहिस्थ १० विद्यार्थी.
 7. आश्रमशाळेमध्ये मुला-मुलीचे प्रमाण ५०:५० प्रमाणे व ५० टक्के मुली मिळाल्या नाहीतर विद्यार्थी क्षमता किमान ३३ टक्के आवश्यक जर सदर टक्केवारी पूर्ण झाली नाही तर आदिवासी विद्यार्थ्यांना प्रवेश देवून क्षमता पूर्ण करणे.
 8. आश्रमशाळेमध्ये प्रत्येक वर्गात शारीरिक दृष्टया अपंग विद्यार्थ्यांसाठी ३ टक्के आरक्षण. दारिद्र्य रेषेखालील आदिवासी जमतीच्या भूमिहीन/अल्पभूधारक विद्यार्थ्यांना प्राधान्य.
संबंधीत मुख्याध्यापक, शासकीय आश्रमशाळा
उद्देश व स्वरूप प्रवेशाच्या अटी अनुदानित आश्रमशाळेस मान्यतेकरिता अटी संपर्क
आदिवासी शैक्षणिक विकासकारिता कार्यरत असलेल्या स्वेच्छा संस्थामर्फत स्थापन करण्यात आलेल्या आश्रमशाळांना १९५३-५४ पासून अनुदान देण्याची योजना राबविण्यात येत आहे.
सदर आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना निवास,भोजन,गणवेश,पुस्तके व इतर लेखन साहित्य व इतर सवलती मोफत उपलब्ध करून देण्यात येतात. त्याकरिता कर्मचार्‍यांचे पगार व परीक्षणाकरिता विहित प्रमाणात अनुदान शासनाकडून देण्यात येते.
शासकीय आश्रमशाळेत प्रवेशकरिता असलेल्या सर्व अटी लागू.
 1. संस्था नोंदणीकृत असली पाहिजे.
 2. विहित नमुन्यात आश्रमशाळा सुरू करण्याच्या ठिकाणाचे सर्वेक्षण, उपलब्ध विद्यार्थी संख्या, संस्थेची आर्थिक स्थिती, आदिवासी क्षेत्रातील कार्य इ. च्या माहिती सह अर्ज करणे आवश्यक.
 1. संबंधित आश्रमशाळांचे मुख्याध्यापक/संस्था चालक.
 2. संबंधित प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प.
उद्देश व स्वरूप पात्रता संपर्क
शासकीय आश्रमशाळांमध्ये इयत्ता १० वी पर्यंत शिक्षण घेऊन पास झालेले अनुसूचीत जमातीचे विद्यार्थी आर्थिक अडचणींमुळे तालुक्याच्या अगर जिल्ह्याच्या ठिकाणी उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेऊ शकत नाही. शासकीय आश्रमशाळांमध्येच त्यांना उच्च माध्यमिक शिक्षण घेता यावे या उदधेशाने शासनाने १९९९ पासून आदिवासी उपयोजना क्षेत्रातील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेत कला व विज्ञान शाखेचे कनिष्ठ महाविद्यालय सुरू करण्यात आलेली आहे. अनुसूचीत जमातीचे इ. १० पास झालेले व उच्च शिक्षण घेवू इच्छिणारे विद्यार्थी संबंधित आश्रमशाळांचे मुख्याध्यापक/प्रकल्प अधिकारी
उद्देश व स्वरूप पात्रता संपर्क
शासकीय / अनुदानित आश्रमशाळांतून शिक्षण घेणार्‍या हुशार / बुद्धिवान / प्रज्ञावंत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ( विद्यानिकेतनच्या धर्तीवर विशेष स्वरूपाची शाळा ) राज्यात दोन ठिकाणी सन 1990-91 या शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्यास शासनाने मंजूरी दिली आहे. आश्रमशाळांतून शिक्षण घेणार्‍या हुशार / बुद्धिवान / प्रज्ञावंत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विद्यानिकेतनच्या धर्तीवर अनुसूचीत जमतीच्या मुलांना शिक्षण देणे. स्पर्धा परीक्षेकरिता संबंधित शाळांचे मुख्याध्यापक, प्रकल्प अधिकारी, प्रवेशकरिता संबंधित आदर्श आश्रमशाळेचे मुख्याध्यापक.
उद्देश व स्वरूप पात्रता संपर्क
आदिवासी विद्यार्थ्यांना शालांत परिक्षोत्तर उच्च शिक्षणाकरिता प्रोत्साहित करण्याच्या दृष्टीने व त्यांना उच्च शिक्षणाचा खर्च भागविता यावा म्हणून भारत सरकारद्वारा ही योजना राबविली जाते.
 1. वैधकीय व अभियांत्रिकीय अभ्यासक्रमातील निवासी विद्यर्थ्यांना रु. 740/- व अनिवासीसाठी रु. 330/-.
 2. तांत्रिकी, आयुर्वैदिक, होमोओपथिक इ.शास्त्र प्रमाणपत्र अभ्यासक्रमातील निवासी विद्यार्थ्यासाठी रु. 510/- दरमहा व अनिवासी विद्यार्थ्यांसाठी रु.330/ दरमहा.
 3. पदवीचे सामान्य अभ्यासक्रम, अभियांत्रिकी पदविका प्रमाणपत्र वास्तूकला इ. साठी निवासी रु. 355/- अनिवासीसाठी रु.185/-.
 4. इ. 11वी 12वी साठी व पदवीचे पहिल्या वर्षातील निवासी विद्यार्थ्यांसाठी दरमहा रु. 235/- व अनिवासीसाठी रु. 140/- निर्वाहभत्ता देण्यात येतो.
 1. विद्यार्थी अनुसूचीत जमातीचा असावा.
 2. पालकांचे वार्षिक उत्पन्न रुपये 1 लाखापेक्षा जास्त नसावे.
 3. विद्यार्थी पूर्णवेळ नोकरीतील नसावा.
 4. एकाच कुटुंबातील फक्त 2 मुलांना परंतु सर्व मुली लाभ घेण्यास पात्र आहे.
 5. विहित नमुन्यात अर्ज सादर केला पाहिजे.
संबंधित महाविद्यालयाच्या प्राचार्यमार्फत प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प.
उद्देश व स्वरूप पात्रता संपर्क
कोणत्याही स्तरावर शिक्षण घेणार्‍या आदिवासी विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण घेता यावे व उत्पन्न मर्यादामुळे भारत सरकार शिष्यवृत्तीसारख्या योजनांचा फायदा मिळू न शकणार्‍या विद्यार्था करिता शिक्षण विभागाने ठरवून दिलेल्या दराने मान्यताप्राप्त शिक्षण संस्थामध्ये शिक्षण घेणार्‍या आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काची शिक्षण संस्थेने प्रतिभूती करण्यात येते.
 1. विद्यार्थी / विद्यार्थीनी आदिवासी असले पाहिजे.
 2. शिक्षण संस्था प्रमुखांमार्फत विहित नमुन्यात प्रस्ताव संबंधित अधिकार्‍याकडे पाठविला पाहिजे
 1. इ. 1ली ते 10वी शाळांच्या मुख्याध्यापकांमर्फत समाजकल्याण अधिकारी, जिल्हा परिषद.
 2. महाविद्यालयीन विद्यार्थी - प्राचार्यांमार्फत संबंधित प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प.