emblem
महाराष्ट्र शासन

आदिवासी विकास विभाग

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, औरंगाबाद

प्रकल्प अंतर्गत येणार्‍या शासकीय वसतिगृहांची माहिती

 

शासकीय वसतिगृहे बांधकामे

 

औरंगाबाद मुलांचे वसतिगृह
     या प्रकल्पात एकूण १४ शासकीय वसतिगृहे कार्यरत असून पैकी ९ मुलांचे व ५ मुलींचे वसतिगृहे आहेत. औरंगाबाद शहरातील जिन्सी व सिडको हे दोन्ही वसतिगृहे शासकीय इमारती मध्ये सुरू असून उर्वरित सर्व वसतिगृहे खाजगी भाडोत्री इमारतीत सुरू आहेत. औरंगाबाद शहरातील १००० क्षमतेचे विभागीयस्तर मुलांचे वसतिगृह व ५०० मुलींची क्षमता असलेले विभागीयस्तर वसतिगृहे यांच्या बांधकामासाठी डों. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विध्यापीठ परिसरात ३ एकर जागा प्राप्त झालेली असून सदर जागेवर इमारत बांधकामासाठी रुपये ४२,९५,११,२४५/- इतक्या रकमेचे अंदाजपत्रकास मा. अपर आयुक्त, आदिवासी विकास, अमरावती यांची मंजूरी प्राप्त झाली आहे. बांधकामाच्या आराखड्याला उपमुख्य वास्तुशास्त्रज्ञ, औरंगाबाद यांची मंजूरी घेण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कार्यवाही सुरू आहे.

 

जालना मुलांचे वसतिगृह
     जालना शहरात १२५ विद्यार्थी क्षमतेचे वसतिगृह सुरू असून सदर वसतिगृहासाठी सर्व्हे न. ४८८ मध्ये ३ हेक्टर २० आर जमीन मा. जिल्हाधिकारी, जालना यांनी ताब्यात दिलेली आहे. सदर जमिनीचे रुपये ७,२०,४७,०००/-इतक्या रकमेचे अंदाजपत्रके मंजुरीसाठी सन २०१५-२०१६ मध्ये सादर करण्यात आले होते. परंतु सदर अंदाजपत्रके सन २०१६-१७ च्या दरसूचिनुसार सुधारित सादर करण्याबाबत मा. आयुक्तलयाने कळविले आहे. त्यानुसार दिनांक २७/७/२०१६ च्या पत्रान्वे सदर अंदाजपत्रके सुधारित सादर करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, जालना यांना कळवलेले आहे व याबाबत पाठपुरवठा सुरू आहे.

 

अ.क्र वसतिगृहे पत्ता गृहपाल दूरध्वनी क्रमांक
1 शासकीय वसतिगृह मुलांचे औरंगाबाद (जीन्सी) जीन्सी, ता. जि. औरंगाबाद
2 शासकीय वसतिगृह मुलांचे औरंगाबाद (सिडको) सिडको, ता. जि. औरंगाबाद
3 शासकीय वसतिगृह मुलांचे औरंगाबाद नवीन मु. पो. औरंगाबाद, ता. जि. औरंगाबाद
4 शासकीय वसतिगृह मुलांचे सिल्लोड मु. पो. सिल्लोड, ता. सिल्लोड, जि. औरंगाबाद
5 शासकीय वसतिगृह मुलांचे कन्नड मु. पो. कन्नड, ता. जि. कन्नड
6 शासकीय वसतिगृह मुलांचे लातूर जुने मु. पो. लातूर, ता. जि. लातूर
7 शासकीय वसतिगृह मुलांचे लातूर नवीन मु. पो. लातूर, ता. जि. लातूर
8 शासकीय वसतिगृह मुलांचे जालना मु. पो. जालना, ता. जि. जालना
9 शासकीय वसतिगृह मुलांचे आंबेजोगाई मु. पो. आंबेजोगाई, ता. आंबेजोगाई, जि. बीड
10 शासकीय वसतिगृह मुलींचे औरंगाबाद ठाकरे नगर ठाकरे नगर, औरंगाबाद, ता. जि. औरंगाबाद
11 शासकीय वसतिगृह मुलींचे औरंगाबाद नवीन मु. पो. औरंगाबाद, ता. जि. औरंगाबाद
12 शासकीय वसतिगृह मुलींचे कन्नड मु. पो. कन्नड, ता. कन्नड, जि. औरंगाबाद
13 शासकीय वसतिगृह मुलींचे लातूर मु. पो. लातूर, ता. जि. लातूर
14 शासकीय वसतिगृह मुलींचे आंबेजोगाई मु. पो. आंबेजोगाई, ता. आंबेजोगाई, जि. बीड